2 Corinthians 10:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे कित्येक स्वत:ची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वत:स स्वत:कडून मोजत असता व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करीत असता बुध्दिहीन असे आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करतात व आपसांत एकमेकांशी तुलना करतात. हे सुबुद्धपणाचे नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही; ते तर स्वतःच स्वत:शी आपले मोजमाप करतात व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करतात; हा शहाणपणा नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याशी तुलना करण्याचे धैर्य आम्ही करीत नाही. ते स्वतःचे आपसात मोजमाप करतात व आपसातच तुलना करतात, ते शहाणे नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडूनच मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात हा शहाणपणा नाही.