2 Corinthians 10:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी, दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. किंवा आम्हांला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही, तर आम्हांस अशी आशा आहे की, तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगदी विस्तर पावलेले असे होऊ.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल, तसतसे आमच्या सेवाकार्याचे क्षेत्र तुमच्यामध्ये देवाने घालून दिलेल्या मर्यादेत अधिकाधिक वाढत जाईल, अशी आम्हांला आशा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसर्‍यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही; तर तुमचा विश्वास वाढत जाईल तसतसे आमच्या मर्यादेचे क्षेत्र तुमच्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल अशी आम्हांला आशा आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे कार्य दुसर्‍यांनी केले आहे त्याबद्दल आम्ही मर्यादा सोडून अभिमान बाळगत नाही. तुमचा विश्वास जसजसा वाढत जाईल तसेच आमच्या कार्याचे क्षेत्र तुम्हामध्ये खूप वाढावे, अशी आमची आशा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही मर्यादा सोडून दुसर्‍यांच्या कामात अभिमान मिरवीत नाही; पण आम्हास आशा आहे की, जसा तुमचा विश्वास वाढेल तसा, आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल.