2 Corinthians 10:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, शुभवर्तमानाचा तुमच्या पलीकडील प्रदेशात प्रसार करु. कारण दुसन्या माणसाच्या प्रदेशात अगोदरच झालेल्या कामाविषयी अभिमान बाळगण्याचे आम्हाला काही कारण नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर तुमच्यापलीकडच्या देशांत शुभवर्तमान घोषित करणे आम्हांला शक्य होईल आणि दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवण्याची आम्हांला गरज भासणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते असे की, तुमच्या पलीकडल्या भागात आम्ही सुवार्ता सांगावी, दुसर्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर तुमच्यापलीकडे, दूरवर असलेल्या प्रांतात आम्हाला शुभवार्ता गाजविता येईल आणि इतर लोकांच्या क्षेत्रात जे काम आधी केले आहे त्याबद्दल अभिमान बाळगण्याचे आम्हास कारण उरणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणजे, दुसर्यांच्या कार्यक्षेत्रात आधीच करण्यात आलेल्या कामाचा अभिमान न मिरवता, आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतांत शुभवर्तमान सांगावे.