2 Corinthians 10:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी आशा करतो की, जेव्हा मी येतो तेव्हा, काही लोक ज्यांना असे वाटते की आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे जगतो त्यांच्याबाबतीत लोक जितकी अपेक्षा करतात, तितका मी धीट असणार नाही, जितकी मी अपेक्षा करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझे मागणे असे आहे: आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत, असे कित्येक लोक मानतात. असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी मला कडकपणे बोलावेसे वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा प्रसंग माझ्यावर आणू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे मागणे असे आहे: आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात; असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हाला विनंती करतो की मी तिथे आलो की ज्याकाही लोकांना वाटते की आमची जीवनशैली ऐहिक आहे, त्यांच्याविरुद्ध कठोर होण्याची गरज भासणार नाही, अशी माझी आशा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्याविरुद्ध कडक होण्याची गरज पडू नये.