2 Corinthians 10:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवाच्या सामर्थ्यशाली शस्त्रांनी तटबंदी जमीनदोस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.