2 Corinthians 11:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वत:च्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी किती तरी प्रवास केला. पुरांमुळे आलेली संकटे, लुटांरूमुळे आलेली संकटे, माझ्या यहुदी देशबांधवांनी आणलेली संकटे, यहुदीतरांनी आणलेली संकटे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी सतत प्रवास केले आहेत आणि नद्यांची संकटे, लुटारूंची संकटे, यहूदी लोकांची संकटे, गैरयहूदी लोकांची संकटे, शहरातील संकटे, गावातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या विश्वासणार्यांपासून संकटे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते.