2 Corinthians 11:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील.