2 Corinthians 12:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाहा, आता तिसन्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे. आणि मी तुम्हांला भार होणार नाही. कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही. तर तुम्हांला मिळवण्यासाठी येणार आहे. शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पाहा, तिसऱ्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे. मी तुमच्यावर भार टाकणार नाही, मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तिसर्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे; आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही; कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात; आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता मी तिसर्यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बघा, मी तिसर्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे.