2 Corinthians 13:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो, यासाठी की, प्रभुने जो अधिकार तुम्हांला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यामुळे मी दूर असताना हे लिहितो, ते अशासाठी की, जो अधिकार जमीनदोस्त करण्यासाठी नव्हे तर उभारणी करण्यासाठी प्रभूने मला दिला आहे, त्या अधिकाराप्रमाणे तुमच्याकडे आल्यावर मला कठोरपणाने वागावयास लागू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते ह्यासाठी की, जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी या गोष्टी माझ्या अनुपस्थित लिहितो ते या आशेने की, तिथे आल्यावर जो अधिकार प्रभूने मला दिला त्याचा कठीण रीतीने वापर करून तुम्हाला पाडण्यासाठी नव्हे तर तुमची वृद्धी करण्यासाठी करू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एवढ्याकरता दूर असताना मी या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.