2 Corinthians 13:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे, कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण त्यास जरी दुर्बलतेत वधस्तंभावर चढविण्यात आले, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्याप्रमाणे दुर्बल आहोत, परंतु तुमच्याबरोबरच्या आमच्या संबंधांत आम्ही त्याच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याने संपन्न आहोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्याबाबत जिवंत असे राहू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना अशक्तपणात क्रूसावर खिळले गेले, तरी परमेश्वराच्या शक्तीने ते जिवंत आहेत. त्यासारखेच आम्ही त्यांच्यामध्ये अशक्त आहोत, तरी परमेश्वराच्या शक्तीने तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी जिवंत आहोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.