2 Corinthians 2:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नाश होत असलेल्या लोकांसाठी मृत्यूचा मरणसूचक गंध आणि तारणप्राप्ती होत असलेल्या लोकांसाठी जीवनाचा जीवनदायक गंध आहोत. हे कार्य करावयास कोण सक्षम आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध, आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करण्यास कोण लायक आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्‍याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?