2 Corinthians 2:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण मी अत्यंत दु:खाने व कळवळून हे लिहित आहे पण तुम्हांला खिन्न करावे म्हणून नव्हे तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीति आहे तिची खोली तुम्हांला समजावी म्हणून लिहित आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळीत तुम्हांला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विपुल प्रीती आहे, ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हांला लिहिले होते; तुम्ही दु:खी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला दुःखी करावे म्हणून नव्हे तर माझ्या प्रीतीची खोली तुम्हाला कळावी, म्हणून हे पत्र मी तुम्हाला क्लेश आणि हृदयाच्या यातना आणि अनेक आसवे गाळून लिहिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण, मी दुःखाने, मनाच्या तळमळीने व अश्रू गाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हास समजावी.