2 Corinthians 3:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे (इस्राएली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत) त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इस्राएली लोकांनी जे निष्प्रभ होत होत नाहीसे होत चालले होते, ते तेज पाहू नये म्हणून मोशेने आपल्या मुखावर आच्छादन घातले होते, तसे आम्ही करत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये ‘म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालत असे,’ तसे आम्ही करत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होत चालले होते ते इस्राएल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये.