2 Corinthians 4:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण आम्ही जे जिवंत आहोत ते आम्ही नेहमीच ख्रिस्ताकरिता मरणाला सोपविलेले आहोत. यासाठी त्याचे जीवन आमच्या मर्त्य शरीराद्वारे प्रकट व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे ह्यासाठी आमचे आयुष्य आम्ही येशूसाठी सदाचे मरणाच्या हाती सोपवलेले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूप्रीत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून आम्ही, जे जिवंत आहोत ते येशूंप्रीत्यर्थ मरणासाठी सोपवून दिलेले आहोत, यासाठी की आमच्या मर्त्य देहांमध्ये सुद्धा त्यांचे जीवन प्रकट व्हावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.