2 Corinthians 6:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची सहभागिता कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?