2 Corinthians 6:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे: “मी त्यांच्याबरोबर राहीन, आणि त्यांच्याबरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.” लेवीय 26:11-12
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत! स्वतः देवाने असे म्हटले आहे, मी त्यांच्यामध्ये निवास करून राहीन व त्यांच्यात फिरेन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’