2 Corinthians 6:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण तो म्हणतो, “माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली.”यशया 49:8 मी तुम्हांला सांगतो, देवाच्या “सोयीची वेळ” आताच आहे. आताच “तारणाचा दिवस” आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण तो म्हणतो: ‘योग्य समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले. पाहा, उचित समय आत्ताच आहे. पाहा, आता तारणाचा दिवस आहे!’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(कारण तो म्हणतो: “अनुकूल समयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.” पाहा, आताच ‘समय अनुकूल आहे;’ पाहा, आताच ‘तारणाचा दिवस’ आहे.)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ते म्हणतात, “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.” मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.