2 Corinthians 7:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले. आमच्या स्वत:च्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषत: तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यामुळे आमचे समाधान झाले आहे आणि आम्हांलाच नव्हे, तर विशेषकरून तीतला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुमच्या सर्वांकडून त्याच्या मनाला उभारी मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषेकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले. परंतु याहून अधिक आनंद आम्हाला मिळाला तो तीताच्या आनंदाने! कारण तुम्ही त्याच्या आत्म्याला ताजेतवाने केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे आणि आमचे सांत्वन इतकेच नव्हे, तर विशेषकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.