2 Corinthians 7:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जेव्हा त्याला तुमचा आज्ञाधारकपणा आठवतो तेव्हा त्याचे तुमच्या विषयीचे प्रेम अधिकच वाढते. त्याचा स्वीकार तुम्ही भीत व कांपत केला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आदरयुक्त भीतीने कंपित होऊन, त्याचे स्वागत करून आज्ञाधारकपणा तुम्ही सर्वांनी कसा दर्शविला, ह्याची तो आठवण करतो, म्हणून त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत होत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तुम्ही सर्वांनी भीत भीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून आज्ञांकितपणा दर्शवला ह्याची तो आठवण करतो; म्हणून त्याला तुमच्याविषयी आत्यंतिक ममता आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या रीतीने भयाने व थरथर कापत तुम्ही सर्वांनी आज्ञांकितपणा दाखवून त्याचा स्वीकार केला, या सर्वगोष्टी आठवून, तुमच्याविषयीची त्याची प्रीती अधिक वाढली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या सर्वांच्या आज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून, कापत कापत, त्याचे कसे स्वागत केले याची त्यास आठवण होत असता तुमच्यासाठी त्याची ममता फारच फार आहे.