2 Corinthians 7:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुम्हांला तुमचा निषेध करावा म्हणून असे म्हणत नाही. मी तुम्हांला अगोदरही सांगितले आहे की, आमच्या अंत:करणात तुमच्याविषयी असे स्थान आहे की, आम्ही तुमच्याबरोबर जगू किंवा मरु.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्हांला दोषी ठरविण्यासाठी मी हे म्हणत आहे, असे नाही; कारण मी पूर्वी सांगितले आहे, त्याप्रमाणे तुम्हांला आमच्या अंतःकरणात असे स्थान आहे की, आम्ही मरणार तर तुमच्याबरोबर व जगणार तर तेही तुमच्याबरोबर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही; कारण मी पूर्वीच सांगितले आहे की, तुम्हांला आमच्या अंत:करणात असे स्थान आहे की, आम्ही मरणार तुमच्याबरोबर व जगणारही तुमच्याबरोबर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला दंडाज्ञा व्हावी म्हणून मी हे सांगत नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या हृदयात स्थान आहे आणि आम्ही जगू किंवा मरू तेव्हा तुमच्याबरोबर असू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही. मी अगोदरही सांगितले आहे की, तुमच्याबरोबर आम्ही जगावे आणि मरावे एवढे तुम्ही आमच्या अंतःकरणात आहात.