2 Corinthians 8:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात. मग समानता येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर हे समानतेने व्हावे म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी समानता व्हावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी, आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या वेळेला सध्या तुमच्या विपुलतेतून ज्याकाही त्यांच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील, पुढे त्यांच्या विपुलतेतून ज्या तुमच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील. आमचे ध्येय समानता असावी असे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी, यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात अशी समानता व्हावी.