2 Corinthians 8:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण तीताने आमच्या आवाहनाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकनेने आणि त्याच्या स्वत:च्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण तीतने आमचे आवाहन तर मान्य केलेच, पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे यावयास निघाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्याने आमची सूचना तर मान्य केलीच; पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तीताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे.