2 Corinthians 8:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ही जी विपुलता आम्हांकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हांवर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही उदारहस्ते करीत असलेल्या कार्यात आमचा हेतू असा आहे की, आम्हांला उदारहस्ते मिळालेल्या ह्या देणगीचा आम्ही कसा विनियोग करतो ह्या बाबतीत आमच्यावर कोणी ठपका ठेवू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमच्याकडून चालवलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणालाही आम्हांला दोष लावता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ही उदारतेने साहाय्यता म्हणून दिलेली देणगी आम्ही कशी हाताळतो याबाबतीत कोणालाही टीका करण्याचा प्रसंग मिळू नये, म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत.