2 Corinthians 8:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून या लोकांना तुमच्या प्रेमाचा पुरावा द्या. आणि आम्हांला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या प्रीतीचे आणि तुमच्याविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण ख्रिस्तमंडळ्यांसमक्ष दाखवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून त्यांना तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुमच्या-विषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळ्यांसमक्ष दाखवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कृपा करून ती प्रीती या बंधुंवरही करा आणि तुम्ही ते सर्व त्यांच्यासाठी कराल असे मी अभिमानाने व जाहीरपणे म्हटले आहे. ते सर्व मंडळ्यांनी पाहावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून या लोकांस तुमच्या प्रीतीचा पुरावा द्या आणि आम्हास तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.