2 Corinthians 8:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले. आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे स्वत:ला दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी आपल्या ऐपतीनुसार व ऐपतीपलीकडेही आपण होऊन दान दिले, हे मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगू इच्छितो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे आपण होऊन दिले.