2 Corinthians 9:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण या सेवेमुळे तुम्ही स्वत:ला योग्य शाबित करता, आणि ते देवाचे गौरव करतात, तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अधीन असल्याने तुमचे स्वीकारणे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या तुमच्या सेवेमधून हे सिद्ध होते की, तुम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान पतकरण्याच्या बाबतीत निष्ठा दाखविल्यामुळे आणि त्यांना व सर्वांना दान देण्याचे औदार्य दाखविल्यामुळे देवाचा गौरव होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, तुम्ही ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यांमुळे देवाचा गौरव होतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही करीत असलेले सेवाकार्य यामुळे तुम्ही सिद्ध करून दाखविले आहे की, तुम्ही ख्रिस्ताच्या शुभवार्तेला कबूल करून आज्ञाधारक राहिला, तसेच तुम्ही त्यांच्या व सर्वांच्याप्रती उदारता दाखविली म्हणून इतरजण परमेश्वराची स्तुती करतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;