2 John 1:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू मानवी देह धारण करुन या जगात आला या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत. असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्तविरोधी होय.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
फसवणूक करणारी, म्हणजेच येशू ख्रिस्त मानव म्हणून आला हे मान्य न करणारी, पुष्कळ माणसे जगात वावरत आहेत. असा मनुष्य फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळजण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.