2 Kings 1:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एलीयाने त्या सर्वाना सांगितले “मी परमेश्वराचा माणूस असेन तर आकाशातून अग्नी उतरुन त्यात तुम्ही सर्व जळून जाल.” तेव्हा आकाशातून परमेश्वराचा अग्नी उत्पन्र झाला आणि त्यात ते सर्वजण जळून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलीया त्याला म्हणाला, “मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीयाहने उत्तर दिले, “मी परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला, व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” मग परमेश्वराचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि त्याला व त्याच्या पन्नास माणसांना भस्म केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीयाने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “जर मी देवाचा मनुष्य (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करो.” पुन्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्या पन्नास मनुष्यांना भस्म केले.