2 Kings 1:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलीया अहज्याला म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनच्या बाल-जबूबकडे माणसे का पाठवलीस? तू असे केलेस म्हणून तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याला म्हटले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्न करायला तू जासूद पाठवलेस ते इस्राएलात देव नाही म्हणून की काय? ह्यास्तव ज्या बिछान्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीयाहने राजाला सांगितले, याहवेह हे म्हणतात: “इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारण्यास दूत पाठविले होते काय? हे कृत्य केल्यामुळे तू या दुखण्यातून उठणार नाहीस; यातच तुला खात्रीने मरण येईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीया अहज्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलात विचारायला परमेश्वर नाही काय? म्हणून तू ‘एक्रोनचा देव बआल-जबूबकडे विचारायला माणसे पाठवलीस? म्हणून आता, ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.”