2 Kings 10:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शोमरोनमध्ये अहाबला सत्तर मुलगे होते. शोमरोनमधील अधिकारी आणि वडीलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. तसेच ज्यांनी या अहाबच्या मुलाना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहाबाचे सत्तर पुत्रपौत्र शोमरोनात राहत असत. येहूने इज्रेल येथील वडील जनांपैकी जे अधिकारी होते त्यांना आणि अहाबाच्या पुत्रांचे पालन करणे ज्यांच्याकडे होते त्यांना पत्रे लिहून शोमरोनास पाठवली; त्यांत असे म्हटले होते:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शोमरोनात अहाबाला सत्तर पुत्र होते. शोमरोनातील अधिकारी आणि वडिलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. व इज्रेलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले.