2 Kings 10:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा येहू आपल्या बरोबरच्या लोकांना म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वाना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने सांगितले, “ह्यांना जिवंत पकडा.” त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि त्या चाळीस पुरुषांना त्या मेंढरे कातरण्याच्या जागेजवळील हौदानजीक जिवे मारण्यात आले; त्याने त्यांच्यातल्या एकालाही जिवंत ठेवले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ-एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वांना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.