2 Kings 10:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता बालच्या सर्व पुरोहितांना आणि संदेष्ट्यांना बोलावून घ्या. तसेच जे जे बालची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यात कोणीही गैरहजर असता कामा नये. बालसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्याला मी ठार करीन हे नक्की” येहूची ही सर्व बतावणी होती. त्याला बालच्या पूजकांचा संहार करायचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता बआलमूर्तीचे सर्व संदेष्टे, सर्व उपासक आणि सर्व याजक ह्यांना माझ्याकडे बोलावून आणा, त्यांच्यातला कोणीही मागे राहू देऊ नका; बआलाप्रीत्यर्थ मला महायज्ञ करायचा आहे. जो कोणी मागे राहील त्याला देहान्त शिक्षा होईल.” बआलमूर्तीच्या सर्व उपासकांचा संहार करावा म्हणून येहूने ही कपटयुक्ती योजली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून बआल दैवताच्या सर्व संदेष्ट्यांना आणि सर्व सेवकांना आणि सर्व याजकांना एकत्र बोलवा. कोणीही अनुपस्थित राहू नये याची खबरदारी घ्या, कारण मी बआलसाठी मोठा यज्ञ करणार आहे. जो कोणी येणार नाही त्याला ठार मारण्यात येईल.” परंतु बआलच्या सर्व भक्तांचा संहार करण्याच्या हेतूनेच येहूने ही योजना आखली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता बआलाच्या सर्व संदेष्टयांना आणि याजकांना बोलावून घ्या. तसेच जे जे बआलाची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यामध्ये कोणीही गैरहजर असता कामा नये. बआलसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्यास मी ठार करीन हे नक्की,” येहूची ही सर्व बतावणी होती. त्यास बआलाच्या पूजकांचा संहार करायचा होता.