2 Kings 10:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बालचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बालच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येहूने सर्व इस्राएलात जासूद पाठवले; तेव्हा बआलमूर्तीचे सर्व उपासक आले, त्यांतला एकही आल्यावाचून राहिला नाही. ते सर्व बआलाच्या देवळात जमा झाले; तेव्हा बआलाचे देऊळ येथूनतेथून सगळे गच्च भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर येहूने सर्व इस्राएलात संदेश पाठविला आणि बआलचे सर्व सेवक आले; कोणीही मागे राहिला नाही. ते बआलचे मंदिर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरेपर्यंत गर्दी करत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बआलाचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बआलाच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.