2 Kings 10:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बालचे सर्व पूजक बालच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्याला जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते यज्ञ करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यास आत गेले. इकडे येहूने ऐंशी पुरुष बाहेर ठेवले होते त्यांना त्याने सांगितले की, “जी माणसे मी तुमच्या हवाली करीन त्यांतला कोणी निसटून गेला तर जो त्याला जाऊ देईल त्याचा प्राण त्याच्याऐवजी घेण्यात येईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून ते यज्ञार्पण व होमार्पण करण्यास आत गेले. आता येहूने ऐंशी माणसांना बाहेर ही ताकीद देऊन उभे केले होते: “जी माणसे तुमच्या तावडीत दिलेली आहेत, त्यातून एकही निसटून जायला नको, जर एकही तुमच्या तावडीतून निसटला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत मोजावी लागेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बआलाचे सर्व पूजक बालाच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्यास जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”