2 Kings 10:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबच्या मुलांचा शिरच्छेद करा. द्या साधारण याच वेळेला त्यांना माझ्याकडे आणा.” अहाबला सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्यांना दुसर्यांदा पत्र लिहून पाठवले, ते असे: “तुम्ही माझ्या पक्षाचे असल्यास व माझे म्हणणे मानत असल्यास आपल्या धन्याच्या पुत्रपौत्रांची शिरे छेदून उद्या ह्या वेळेपर्यंत माझ्याकडे इज्रेल येथे हजर व्हा.” राजपुत्र सत्तर होते, त्यांचे पाबन करणार्या नगरातल्या थोर लोकांजवळ ते राहत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.” आता सत्तर राजपुत्र शहराच्या प्रमुख व्यक्तीबरोबर होते, जे त्यांचे संगोपन करत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा. साधारण याच वेळेला इज्रेल येथे त्यांना माझ्याकडे आणा.” अहाब राजाची सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते.