2 Kings 11:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांना खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती पाहते तर वहिवाटीप्रमाणे राजा उच्च स्थानी उभा आहे; त्याच्याजवळ सरदार व कर्णे वाजवणारे उभे आहेत व सर्व लोक आनंद करून कर्णे वाजवत आहेत असे तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा अथल्या आपली वस्त्रे फाडून, “फितुरी रे फितुरी!” असे ओरडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिने बघितले की रीतीनुसार राजा खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक आनंद करीत कर्णे वाजवित होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी रे, फितुरी!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे रहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांस खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.