2 Kings 11:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला; तसाच त्याने राजा व प्रजा ह्यांच्यामध्येही करार करवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यहोयादाने याहवेह आणि राजा आणि प्रजा यांच्यात एक करार केला की ते याहवेहची प्रजा असणार. त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही एक करारही केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे, असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यामध्ये होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे त्यामध्ये म्हटले होते.