2 Kings 12:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योवाशच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशनेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूदाचा राजा यहोआश ह्याने असे केले: त्याचे वाडवडील, यहोशाफाट, यहोराम व अहज्या ह्या यहूदाच्या राजांनी व त्याने स्वतः ज्या वस्तू परमेश्वराला वाहिल्या होत्या त्या, आणि परमेश्वराच्या मंदिराच्या व राजभवनाच्या भांडारात जेवढे सोने सापडले ते सर्व घेऊन त्याने अरामाचा राजा हजाएल ह्याच्याकडे पाठवले; तेव्हा तो यरुशलेमेजवळून निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योवाशाच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वरास बऱ्याच पवित्र गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशानेही बरेच काही परमेश्वरास दिले होते. योवाशाने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामाचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरूशलेमेला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.