2 Kings 12:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिमाथचा मुलगा योजारवार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले. दावीद नगरात लोकांनी योवाशला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशचा मुलगा अमस्या त्याच्यानंतर राज्य करु लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योजाखार बिन शिमाथ व यहोजाबाद बिन शोमर ह्या त्याच्या चाकरांनी त्याला जिवे मारले; तो मेल्यावर त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या वाडवडिलांच्या थडग्यात मूठमाती दिली; त्याचा पुत्र अमस्या त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या अधिकार्‍यांनी त्याचा वध केला ते शिमाथाचा पुत्र योजाखार व शोमेराचा पुत्र यहोजाबाद हे होते. तो मरण पावला आणि त्याला दावीदनगरीत पूर्वजांच्या सोबत मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र अमस्याह हा त्याच्या जागी राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमाथचा मुलगा योजाखार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशाचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले. दावीद नगरात लोकांनी योवाशाला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशाचा मुलगा अमस्या त्यानंतर राज्य करु लागला.