2 Kings 12:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाखणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वराला वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणाला एक भोक पाडले आणि ती परमेश्वराच्या मंदिरात येणार्यांच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेवली. परमेश्वराच्या मंदिरात जेवढा पैसा येत असे तेवढा द्वाररक्षक याजक त्या पेटीत टाकत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयादा याजकाने एक पेटी घेतली व तिच्या झाकणाला एक छिद्र पाडले. ती पेटी त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वेदीच्या उजव्या बाजूला ठेवली. प्रवेशद्वाराचे पहारेकरी याजक याहवेहच्या मंदिरात आणलेले सर्व पैसे पेटीत घालू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाकणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वरास वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.