2 Kings 13:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशा आजारी पडला. त्या आजारातच पुढे तो मरण पावला. इस्राएलचा राजा योवाश त्याला भेटायला गेला. अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्याला रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, ही इस्राएलच्या रथांची आणि घोड्यांची वेळ आहे का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या दुखण्याने अलीशा मरणार होता ते त्याला आता लागले; तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्याच्याकडे गेला. तो ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, “बाबा! अहो बाबा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता अलीशा ज्या आजाराने मरणार होता त्या आजाराने तो ग्रस्त झाला. इस्राएलाचा राजा योआश त्याला भेटावयाला खाली आला आणि त्याच्यासाठी रडला. तो रडत म्हणाला, “माझ्या पित्या! माझ्या पित्या! तुम्ही इस्राएलचे रथ आणि त्याचे स्वार!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”