2 Kings 13:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अलीशा त्याला म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्याला बाण मारायला सांगितले. योवाशने बाण सोडला. अलीशा त्याला म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामवरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने सांगितले, “पूर्वेकडील खिडकी उघड.” त्याने ती उघडली. मग अलीशा त्याला म्हणाला, “बाण सोड.” तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, “हा बाण परमेश्वराकडून होणार्‍या सोडवणुकीचे म्हणजे अरामापासून सुटण्याचे चिन्ह होय; तू अफेक येथे अराम्यांना असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीशा त्यास म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्यास बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलीशा त्यास म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”