2 Kings 13:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरामच्या राजाने यहोआहाजच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांना त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे यहोआहाजच्या सैनिकांची अवस्था होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सेनेत केवळ पन्नास स्वार, दहा रथ व दहा हजार पायदळ एवढेच राहू दिले होते व बाकीच्यांचा नाश करून त्यांना तुडवून धुळीस मिळवले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोआहाजाकडे पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजार पायदळ याशिवाय काही शिल्लक राहिले नाही, कारण अरामी राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा पायांखालील धुळीच्या कणांप्रमाणे संहार केला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांस त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलफटाप्रमाणे यहोआहाजाच्या सैनिकांची अवस्था होती.