2 Kings 14:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अदोमचा तू पराभव केलास हे खरे पण त्या विजयाने तू जन्मत्त झाला आहेस. पण आहेस तिथेच राहून बढाया मार. स्वत:ला संकटात लोटू नको. हे ऐकले नाहीस तर तुझा आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू अदोमाचा मोड केल्यामुळे तुझे हृदय उन्मत्त झाले आहे; त्याविषयी फुशारकी मारत आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तर तू होऊन अरिष्टाला का आमंत्रण करत आहेस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खचितच तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि त्यामुळे तू उन्मत्त झाला आहेस. त्याचे गौरव करीत तू घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश का करावा?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू अदोमचा पराभव केलास हे खरे, म्हणून तुझ्या मनाने तुला उंचावले आहे. तू त्याविषयी गौरव करीत घरी राहा, तू पडशील आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल असा तू अरिष्टांशी झगडा का करावा?”