2 Kings 14:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही कारण मोशेच्या नियमशास्त्रात याबद्दलचे नियम सांगितलेले आहेत. मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने पुढील आज्ञा सांगितलेली आहे: “मुलांच्या गुन्ह्या करिता आईवडिलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडिलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्या खून करणार्यांची मुलेबाळे त्याने जिवे मारली नाहीत; कारण मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, “पुत्रांसाठी पित्यांना, पित्यांसाठी पुत्रांना मारू नये; जो तो आपल्याच पापामुळे प्राणास मुकावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, कारण नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही, त्याऐवजी त्याने मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले, परमेश्वराने जी आज्ञा केली की: “मुलांच्या गुन्ह्या करता आई-वडीलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडीलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. त्याऐवजी अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”