2 Kings 14:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा योवाशने यहूदाचा राजा अमस्या याला उत्तर पाठवले की, “लबानोनमधल्या काटेरी झुडुपाने लबानोनमधल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला, “तुझ्या मुलीला माझ्या मुलाची बायको करुन घ्यायचे आहे.” पण लबानोनमधला एक वन्यपशू वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून पुढे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा राजा यहोआश ह्याने यहूदाचा राजा अमस्या ह्याला सांगून पाठवले की, “लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्याच एका गंधसरूकडे मागणी केली की, ‘तुझी मुलगी माझ्या मुलास दे;’ लबानोनात असलेला एक वनपशू त्या वाटेने गेला व त्याने ते काटेझुडूप पायांखाली तुडवून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इस्राएलचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अमस्याहला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इस्राएलाचा राजा योवाशाने यहूदाचा राजा अमस्या याला निरोप पाठवून म्हटले की, “लबानोनातल्या काटेरी झुडुपाने लबानोनातल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला की, तुझी मुलगी माझ्या मुलाला पत्नी करून दे.” पण लबानोनातल्या एका वन्यपशूने वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून टाकले.