2 Kings 15:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघाडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणार्‍या लोकांना मार दिला; त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यांना हा मार दिला; त्याने तेथल्या गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी, तिरजाहपासून निघालेल्या मनाहेमाने तिफसाह आणि शहरातील आणि सीमेच्या क्षेत्रातील सर्वांवर हल्ला केला, कारण त्यांनी आपली वेस उघडण्यास नकार दिला. त्याने त्यांना मार दिला आणि सर्व गरोदर महिलांना चिरून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनहेमने तिफसाह तसेच त्यातले सर्वजण, तसेच तिरसापासून त्याच्या सीमेमधले सर्वजण जीवे मारले, कारण लोकांनी त्यास नगराची वेस उघडून दिली नाही, म्हणून त्यांने त्यांना मारले. त्याने त्या नगरातल्या सर्व गर्भवती स्त्रियांनाही कापून टाकले.