2 Kings 15:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध:पात झाला तीच पापे मनहेमने केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने आमरण सोडली नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली, त्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध:पात झाला तीच पापे मनहेमने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात केली, त्यापासून तो फिरला नाही.