2 Kings 15:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी करद्यापाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अश्शूराच्या राजाला देण्यासाठी मनहेमाने इस्राएलातल्या मोठमोठ्या धनवान लोकांकडून प्रत्येकी पन्नास शेकेल चांदी काढली. मग अश्शूरचा राजा परत गेला, देशात थांबला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनाहेमाने हा पैसा इस्राएलमधून वसूल केला. अश्शूरच्या राजाला द्यायला प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने पन्नास चांदीचे शेकेल द्यायचे होते. मग अश्शूरचा राजा मागे फिरला आणि देशात राहिला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा पैसा उभा करायला मनहेमने इस्राएलातील श्रीमंत लोकांवर कर बसवला. त्याने प्रत्येकाला पन्नास शेकेल चांदी कर द्यायला लावला. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.