2 Kings 15:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने त्याच्याशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोर्यात त्याला व त्याच्याबरोबर अर्गोब व अरये ह्यांना वधले; पेकहाबरोबर पन्नास गिलादी लोक होते; त्यांना वधून त्याच्या जागी तो राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रमाल्याचा मुलगा पेकह हा त्याचा सरदार होता. त्याने अर्गोब व अरये आणि गिलादी लोकांतले पन्नास माणसे आपल्यासोबत घेतली, आणि त्याच्याविरुध्द कट करून त्यास शोमरोन मध्ये राजाच्या घरांतल्या महालात मारून ठार केले आणि त्याच्या जागी पेकह राज्य करू लागला.